राधा

कृष्णकाळ्या रात्रीतून  नितळ पाझरतो चांदणझरा..

प्राजक्त टपकतो रुक्मिणीच्या दारात..
आणि रुसलेल्या सत्यभामेची समजूतच काढायला की  काय,
स्वर्गातून थेट उतरून येतात..
दवबिंदू..

आणि तिथे अख्खी यमुना राधेच्या मनात..
चंद्र विसरून विसावलेली गूढ  काळ्या घनात.. 

Comments

Popular Posts