मी आणि मी

कधी कधी गप्पा मारते मी माझ्याशीच..

असाच बोलता बोलता, 
गूढ-गहन विषय
अवजड-बोजड भाषेत
हिरिरीने मांडते..

आणि प्रत्त्युत्तर देते..
कालची खरेदी बघता बघता,
जीवन वगैरे तत्त्वं  मांडते..

करत बसते गावगप्पा..
अन करते यथेच्छ निंदा जगाची..

'तिचं ते ऐकलेलं' पडताळून पाहते..
'त्याचं वागणं बदलल्याची' चिंता व्यक्त करते..

आणि मग उगाच चेहरा पाडते..
मी एकटी पडल्याचं वाटून,
मायेनं जवळ घेते..
विषय बदलते,शांत करते..

आजकाल भेट होत नाही पूर्वीसारखी..
स्वतःहून येत जा,
नेहमी मीच बोलवायचं का?

डोळ्यात तरारून पाणी येतं..

पुसते,अन स्वतःच्या वेडेपणाला हसत,
मिसळून जाते गर्दीत..


Comments

Post a Comment

Popular Posts