निरागस

देठापासून तुटल्यावर,
असे हेलकावे..
असे अधांतर..
की दडपूनच जावा
तो इवलासा जीव..

पण तरी,
वाऱ्यालाच करत,
खट्याळ गुदगुल्या,
अलगद उतरतं
बकुळीचं फूल,
आणि हसत राहतं,
मंद सुगंधी..

Comments

Post a Comment

Popular Posts