कृष्णकमळ


कुठे हरवली कालिंदी अन कुठे हरवली वेणू 
मोरपीसही कुठे दिसेना कृष्ण हरवला जणू..

असे बोलता अवचित दिसली नभी सावळी प्रभा,
फुलून आले कृष्णकमळ अन कृष्ण त्यामधे उभा!

Comments