कुरुक्षेत्र
हे तीन वेगवेगळ्या संदर्भातील वेगवेगळे विचार .त्यांना जोडणारं सूत्र म्हणून मला महाभारतातील वेगवेगळ्या कथा सापडल्या ..तो हा प्रयत्न..
१. डोळे मिटलेली गांधारी अजून आहे..
ती डोळे उघडते,
तेव्हा नाही बघत कुरुक्षेत्रावरचा संहार.
पण अभेद्य बनवते,
दुर्योधनाला..
कृष्ण असतोच समर्थ.
पण भीमावर बसतो शिक्का,
अधर्म्य युद्धाचा..
आणि गांधारी पटकन दिसतच नाही..
पण ती आहेच..
शांत उभी
डोळे बांधलेली..
लांब हातांनी,
कौरव-पांडव युद्धाचा तराजू तोलत..
२.कुंतीच्या शापाचा धागा पकडून,
जाळं विणलं जातं ..
कर्णच काय,
कुणाचंच कवच टिकत नाही..
अन् क्षणोक्षणी उभं राहतं
एक नवं कुरुक्षेत्र..
मन उद्ध्वस्त होतं ..
३. कुरुक्षेत्र हेच सत्य..
अन् पराक्रमाची भुतं..
बाकी तेल मागणारे अश्वत्थामे
अपमानित चिरंजीव..
Comments
Post a Comment