माझी आई
शैशवात पाळण्यात
नेत्र तुझे जाग रात ..
बालपणी अंगणात
तुझी नजर येत जात ..
तरुणाई भिरभिरती
डोळा तुझ्या काय भीती ?
निघताना अडखळले ,
तुझे डोळे
दव-ओले..
धडपडते आकाशी
नाही आज तुझ्यापाशी..
दिठी तुझी
माझे ठायी
जरी दूर
माझी आई..
नेत्र तुझे जाग रात ..
बालपणी अंगणात
तुझी नजर येत जात ..
तरुणाई भिरभिरती
डोळा तुझ्या काय भीती ?
निघताना अडखळले ,
तुझे डोळे
दव-ओले..
धडपडते आकाशी
नाही आज तुझ्यापाशी..
दिठी तुझी
माझे ठायी
जरी दूर
माझी आई..
Comments
Post a Comment